नवी दिल्ली – भारतीय लष्कर आणि जपानचे लष्कर यांच्यात आजपासून धर्म गार्डियन या संयुक्त युद्ध सरावाची सुरुवात झाली. आजपासून ९ मार्च या कालावधीत राजस्थानच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजेसवर हा युद्धसराव होणार आहे.
धर्म गार्डियन हा वार्षिक युद्धसराव आहे आणि भारत आणि जपानमध्ये त्याचे आलटून पालटून आयोजन करण्यात येते. दोन्ही देशांच्या पथकांमध्ये प्रत्येकी ४० सैनिकांचा समावेश आहे.
३४ वी इन्फन्ट्री रेजिमेंट जपानच्या पथकाचे प्रतिनिधित्व करत आहे तर राजपुताना रायफल्सची एक बटालियन भारतीय पथकाचे प्रतिनिधित्व करत आहे.
निम-शहरी वातावरणात संयुक्त मोहिमांमधील एकत्रित क्षमतेमध्ये वाढ करणे आणि लष्करी सहकार्य वृद्धिंगत करण्याचा या सरावाचा उद्देश आहे. अतिशय उच्च शारीरिक क्षमता, संयुक्त नियोजन, संयुक्त लष्करी डावपेचांचे सराव आणि विशेष सशस्त्र कौशल्यांचे मूलभूत धडे यावर या सरावात भर दिला जातो.