Dhangar Reservation – गेल्या २१ दिवसांपासून चौंडी येथे धनगर आरक्षण प्रश्नी उपोषणावर अखेर आज तोडगा निघाला आहे. सरकारतर्फे गिरीश महाजन यांनी केलेल्या शिष्टाईला यश आलं असून यशवंत सेनेतर्फे उपोषण मागे घेण्यात आले आहे.
धनगर समाजाला ST संवर्गातून आरक्षण देण्यात यावे ही उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी होती. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत उपोषणकर्त्यांची २२ सप्टेंबरला एक बैठक झाली होती. मात्र ही बैठक अपयशी ठरली होती.
मराठा आरक्षणाची कोंडी फुटल्यानंतर धनगर समाजाने देखील आरक्षणाचा प्रश्न डाऊन धरला होता. अशात कोंडीत सापडलेल्या शिंदे सरकारसाठी गिरीश महाजन संकटमोचक ठरले आहेत. | Dhangar Reservation