धनगर आरक्षण व करोनाविरोधातील लढ्यासाठी मदत

राजमाता अहिल्यादेवी जयंतीदिनी लोणंदच्या उत्सव समितीचा निर्णय

लोणंद  -राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी लोणंद, ता. खंडाळा येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीच्यावतीने करोनाच्या लढ्यात झटत असलेली यंत्रणा आणि धनगर आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईच्या खर्चासाठी एकूण 22 हजाराची आर्थिक मदत देण्यात आली. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्सव समितीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार आपापल्या घरी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन व लोणंद येथील स्मारकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आणि धनगर आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी प्रत्येकी 11 हजार रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी नगरसेवक लक्ष्मणराव शेळके-पाटील, हणमंत शेळके-पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य भरत शेळके-पाटील, विठ्ठलराव शेळके-पाटील, शिवाजीराव शेळके-पाटील, वैजनाथ शेळके-पाटील, सुनील शेळके-पाटील, सागर शेळके-पाटील, काशिनाथ शेळके-पाटील, राहुल धायगुडे, गणेश शेळके, अमोल ठोंबरे, सूरज शेळके-पाटील, रामदास शेळके- पाटील, अमित शेळके-पाटील, ओंकार शेळके-पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.