entertainment news – सध्या बॉलिवूड चित्रपटांच्या सिक्वेलचे युग सुरू आहे. ‘भूल भुलैया 2’, ‘गदर 2’ आणि OMG 2 च्या यशानंतर निर्माते सिक्वेलवर वेगाने काम करत आहे. अलीकडेच सुभाष घई यांनीही ‘खलनायक 2’ रुपेरी पडद्यावर येणार असल्याची घोषणा केली. आता अशात आणखी एका सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा रंगली आहे. हि चर्चा अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या ‘धडकन’ चित्रपटाची आहे. Dhadkan 2, Shilpa Shetty, Akshay Kumar, Sunil Shetty,
2000 मध्ये रिलीज झालेल्या ‘धडकन’चा सिक्वेल लवकरच येऊ शकतो, अशी सतत चर्चा होती. याबाबत निर्मात्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मला ‘धडकन 2’ची ऑफर आली आहे. ‘धडकन’चे निर्माते रतन जैन दशकभरापासून माझ्याशी संपर्क साधत आहेत. माझ्या मते धडकन हा एक क्लासिक चित्रपट आहे. त्याचा सीक्वल बनवला तर पुन्हा ‘कभी कभी’ (1976) बनवावा लागेल असेच होईल. मात्र गदर २ च्या यशानंतर मला पुन्हा चित्रपट बनवण्यास सांगितले जाते.’ Dhadkan 2, Shilpa Shetty, Akshay Kumar, Sunil Shetty,
‘धडकन 2’ बनवण्यासाठी त्याने निर्मात्यांसमोर आपल्या अटी ठेवल्याचंही डायरेक्टर धर्मेशने सूचित केलं. धर्मेश म्हणाले, ‘मी निर्मात्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, आम्ही कोणत्याही बाबतीत तडजोड करणार नाही तरच मी धडकन 2 चित्रपट बनवणार आहे. मला माहित नाही की तो किती मोठा हिट होईल. पहिल्या भागाबद्दलही मला खात्री नव्हती. Dhadkan 2, Shilpa Shetty, Akshay Kumar, Sunil Shetty,
यादरम्यान धर्मेशला शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्याबाबतही चौकशी करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले, ‘मी कास्टिंगचा अजिबात विचार केलेला नाही.’ मात्र, ‘धडकन 2’मध्ये काम सुरू केल्याचे दिग्दर्शकाच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. Dhadkan 2, Shilpa Shetty, Akshay Kumar, Sunil Shetty,