Devendra Fadnavis – मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मागणीवरून राज्याच्या काही भागात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपुरातील निवासस्थानी पोलिसांनी (police) बंदोबस्त वाढवला आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी मराठा आरक्षण (maratha reservation) समर्थकांच्या एका गटाने नागपुरातील महाल परिसरात ‘मुंडन आंदोलन’करण्याचा इशारा या आधीच दिला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.
काही आमदार व लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ल्यांचे प्रकार घडले आहेत. मराठा आंदोलकांच्यावतीने काही जणांनी या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमक भाषेत टिका केल्याने दक्षतेचा उपाय म्हणून त्यांच्या घराभोवीतीचे पोलिस संरक्षण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.