खालापूर : खोपोली नगरपालिकाकडून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील झोपडपट्टी रहिवासी भागात सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृह उभारण्यात येत आहेत. त्यानुसार प्रभाग क्र. 3 मधील प्रकाशनगर येथे स्वच्छ भारत अभियनातर्गंत दहा सीटचे शौचालय संकुलाचे लोकार्पण गुरुवारी (दि. 22) करण्यात आले.
स्थानिक नगरसेवक किशोर पानसरे, सुनीता गायकवाड यांच्या पाठपुराव्याने हे शौचालय निर्माण झाले आहे. या वेळी नगराध्यक्षा सुुुुमन औसरमल, मुख्याधिकारी गणेश शेटे, उपनगराध्यक्षा विनिता कांबळी, आरोग्य सभापती वैशाली जाधव, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, नगरसेविका माधवी रिठे, जिनी सॅंम्युअल, नगरसेवक दिलीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते रमेश मोगरे, प्रवीण क्षीरसागर, बीआरएसपी तालुकाध्यक्ष अमित पवार आदी उपस्थित होते. अशाच प्रकारे अन्य रहिवासी भागांत ही शौचालय व स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत.