देऊळगावराजे – येथील परिसरामध्ये राज्य सरकारच्या 2515 अंतर्गत देऊळगावराजे येथे विविध प्रकारची विकासकामे चालू आहेत; पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देऊळगावराजे ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता विकासकामे चालू आहेत, तसेच 2018-19 मध्ये देऊळगावराजे येथे गटार लाइन करण्यात आली आहे; पण ती ग्रामपंचायत न विचारात करण्यात आली आहे, तरी येथून पुढे ग्रामपंचायतीला विचारात न घेता कामे केली, तर ग्रामपंचायत न हरकत दाखला देण्यात येणार नाही, या निवेदनावर सरपंच स्वाती गिरमकर, उपसरपंच चतुर खेडकर यांच्या सह्या करून निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागला देण्यात आले आहे.