नवीदिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असून त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.आज चिदंबरम यांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांची २ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत वाढवण्यात आली आहे. या वेळी चिदंबरम हे चौकशीस सहकार्य करत नसल्याचा युक्तिवाद सीबीआय कडून करण्या आला.
दरम्यान चिदंबरम यांना अटक झाल्यानंतर तिसऱ्यादा कोठडी वाढवावी लागली आहे. या वेळी सीबीआय कडून ५ दिवस कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली. त्यावर ”तुम्ही प्रत्येकवेळी ५ दिवसांचीच कोठडी वाढवून का मागत आहात. एकदाच १५ दिवसांची कोठडी का मागत नाही”. अशी विचारणा कोर्टाकडून सीबीआय ला करण्यात आली. चिदंबरम चौकशीत सहकार्य करत नाहीत. असमाधानकारक उत्तरं देतात. त्यामुळे या प्रकरणातील अन्य आरोपींची व त्यांची समोरासमोर चौकशी करावी लागणार आहे. असे सांगत सीबीआय ने कोठडी वाढवून मागितली आहे. तर चिदंबरम यांना आत्तापर्यंतच्या चौकशी मध्ये ४०० प्रश्न विचारण्यात आले असल्याचा दावा त्यांच्या वकिलाने केला आहे.
चिदंबरम यांनी सीबीआय कोठडीला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्यावर चिदंबरम यांच्या या अर्जावर २ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे कोर्टाकडून नमूद करण्यात आले आहे.