औंध – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आगामी जयंतीमध्ये डीजे आणि लेझरचा वापर वर्षीपासून बंद करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. यासोबतच पुणे शहरातील विविध मंडळे आणि विहारांना भेट देऊन त्यांनी जयंतीमध्ये डीजेचा वापर करू नये, यासाठी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कॅटालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या वतीने डॉल्बीमुक्त आंबेडकर जयंती साजरी करण्यासंदर्भात विचारमंथन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आंबेडकरी नेते, प्राध्यापक, पत्रकार, डॉक्टर यांनी सहभाग घेतला.
माजी आमदार जयदेव गायकवाड, पुण्याचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, विद्यापिठातील प्रमुख डॉ. मनोहर जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय जाधव, अभ्यासक केशव वाघमारे, डॉ. पवन सोनवणे, नागपूर विद्यापीठाच्या डॉ.अविनाश फुलझेले, लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष संजय आल्हाट, माजी सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, निखिल गायकवाड, जितेंद्र गायकवाड, अनिल माने आदी यावेळी उपस्थित होते.