मुंबई – काल महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत असताना राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी ‘देश का पंतप्रधान कैसा हो.. शरद पवार जैसा हो’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेल्या उत्तराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
काल वाय बी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकत्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देश का पंतप्रधान कैसा हो.. शरद पवार जैसा हो’ अशी जोरदार घोषणाबाजी केली.
“शरद पवारांना पंतप्रधान बनवण्यास काहीही हरकत नाही. पण आधी सर्वांनी एकत्र येऊन लढा. आधी गावपातळीवर एकत्र येऊन दाखवा” असं ठाकरे कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीबाबत म्हणाले. यावेळी ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर देखील जोरदार निशाणा साधला.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे बोलत असताना शरद पवार आणि पंतप्रधान पदाबाबतच्या घोषणा दिल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले,”काही हरकत नाही पण सगळे एकत्र येऊन लढा नाहीतर आपण तुझं-माझं करत राहू,त्यामुळे आपण सगळे इकडेच राहू आणि घोषणा देणारेही इथेच राहतील. पंतप्रधान पद मिळवणं हे फार मोठं स्वप्न आहे. आधी गाव पातळीवर एकत्र येऊन दाखवा. गावपातळीवर एकत्रित आलो की पुढचं सगळं काम सोपं होईल” असं उद्दाहव ठाकरे स्पष्ट मत ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं.