मुंबई – बॉलिवूड अभिनेता जान्हवी कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबतच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड इमेजसाठीही खूप चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ माजवत असते. जान्हवीचे चाहते तिच्या नवीन पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात.
बॉलीवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी म्हणून जान्हवी सगळ्यांना माहिती आहे. पण गेल्या काही वर्षांपासून जान्हवीनं तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर जान्हवीचा चाहतावर्ग मोठा आहे. चाहते अभिनेत्री बद्दल प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात.
दरम्यान, अश्यातच अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या लग्नात कोणत्याही प्रकारचे भरजडीत कपडे नको असून अभिनेत्रीला साधी कांजीवरम साडी हवी आहे. मेहंदीसाठी गुलाबी रंगाचा ड्रेस आणि संगीतसाठी पिवळ्या रंगाचा ड्रेस हवा आहे. अशाप्रकारे अभिनेत्री तिचं वेडिंग प्लान सर्वांना सांगितला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत तिने आपला प्लॅन सांगितला आहे. दरम्यान, अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच “दोस्ताना 2′ आणि “मिस्टर एन्ड मिसेज माही’ या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.