वाघोली, (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री, ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सदिच्छा भेट घेत शिरूर – हवेली मतदारसंघातील जनतेच्या महत्त्वाच्या विषयासंदर्भात संवाद साधून विविध मागण्यांचे निवेदन दिले.
शिरूर तालुक्यातील चासकमान प्रकल्पाच्या अस्तरीकरणासाठी 1957 कोटी मंजूर निधीस प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. डिंभे उजवा तीर कालव्यांमध्ये ज्या शेतकर्यांच्या जमीनी संपादित झाल्या आहेत त्यांना लवकरात लवकर मोबदला मिळण्याची मागणी करण्यात आली.
शिरूर तालुक्यातील येथे निमोणे पॉवर हाऊस साठी 11केव्हीचे 81 ट्रान्सफॉर्मर मिळण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती प्रदीप कंद यांनी दिली.