सातारा -प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्य शिक्षक नेते उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप कदम, जिल्हा नेते शंकरराव देवरे, जिल्हा सरचिटणीस किरण यादव,माजी चेअरमन नवनाथ जाधव यांची उपस्थिती होती. प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे शासनाची हेतूपूर्वक डोळेझाक सुरू असल्याने शिक्षक समितीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.
मुख्यालयाला राहण्याची अट रद्द करावी, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी त्वरित द्यावी, नगरपालिका, महानगरपालिका शिक्षकांच्या प्रश्न सोडवावेत, कंत्राटी स्वयंसेवक पद्धत तात्काळ बंद करावी, राज्यातील रिक्त शिक्षकांची पदे त्वरित भरावीत, बदली धोरणामध्ये सुधारणा करून ऑनलाइन बदली धोरण कायम ठेवावे, आश्वासित प्रगती योजना लागू करावी, वस्ती शाळा शिक्षकांचे लाभ पूर्वसेवा धरून द्यावेत, 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांच्या कपातीचा हिशेब द्यावा, ऑनलाइन कामे यासाठी खर्चाची तरतूद करावी, कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद हे धोरण बंद करावे, बीएलओसह सर्व अशैक्षणिक कामे बंद करावीत, शाळा एकत्रिकरण धोरण बंद करावे यांसह अनेक प्रलंबित मागण्यांकरिता आंदोलन करण्यात आले.
यावेळी गजानन वारागडे, श्रीकांत दोरगे, अनिल पिसाळ, मोहन सातपुते, बाळकृष्ण कुंभार, संतोष घोडके, चंद्रकांत कांबळे, अनिल डोईफोडे, आबासाहेब जाधव, संतोष कोळेकर, किरण फाळके, अरुण पाटील, सचिन पांढरपोटे, तातोबा भिसे, वसिम वारूणकर, विनायक चव्हाण, तानाजी यादव, सुरेश पार्टे, सरचिटणीस निलेश कर्वे, नितीन घनवट, बाबुराव चव्हाण, उमेश माने, राजू संकपाळ, नारायण सातपुते, सी. एम. जाधव, रवींद्र कुंभार उपस्थित होते. बॅंकेचे संचालक नितीन शिर्के, सुरेश पवार, तानाजी कुंभार, नितीन काळे, पुष्पलता बोबडे, विशाल कणसे, नितीन फरांदे, माजी संचालक सुभाष शेवाळे, शिवाजी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.