मुंबई – एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघत आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध बंडखोर नेते एकनाथ शिंदे या वादाला सुद्धा तोंड फुटले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन केले.
मुंबईत सुद्धा शिवसेनेकडून आज शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मुंबईमध्ये शिवसेनेच्या मुखपत्राच्या कार्यालयापासून ते शिवसेना भवन येथे बाईक रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आज मुंबईत मेळावे घेतले. त्यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही काही ठिकाणी मेळावे घेत मार्गदर्शन केले.
सध्या राज्यात जो काही सत्ता संघर्ष आणि राजकीय गोंधळ सुरु आहे त्यामुळे विविध ठिकाणी रॅली काढली जात आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट आणि या दोन्ही घटनांचे समर्थक शक्ती प्रदर्शन करत आहेत.