नवी दिल्ली – महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र अनेक महिला अशाही आहे ज्या की स्वत:वर होणार अन्याय सहन करू शकत नाही. अशीच एक घटना छत्तीसगढमध्ये घडली असून संतप्त महिलेने भाजपच्या नगरसेवकाची चपलेने धुलाई केली.
बलौदाबाजार येथे भाजप नगरसेवकाने आपल्या मित्राच्या पत्नीला शरीरसंबंध ठेवण्याची ऑफर दिली. हे ऐकताच संतापलेल्या महिलेने नगरसेवक असलेल्या नराधमाला चपलेने धुतला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सविस्तर महिती अशी की, भाजप नगरसेवक आपल्या मित्राच्या घरी गेला होता. यावेळी दीर आणि वहिणीमध्ये चेष्टा मस्करी चालते, अस म्हणत त्याने वहिणीची मस्करी केली. त्यानंतर नगरसेवकाने मित्राच्या पत्नीला थेट शारीरसंबंध ठेवण्याची ऑफर दिली. सूर्यकांत ताम्रकर असं या भाजप नगरसेवकाचं नाव आहे.
दरम्यान नगरसेवकांचे शब्द ऐकताच महिलेचा पारा चडला. महिलेने संतप्त होऊन नगरसेवकाला चपलेने मारहाण केली. या घटनेत मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या महिलेच्या पतीला देखील चपलेचा प्रसाद खावा लागला.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा भाजप नगरसेवक सूर्यकांत ताम्रकर याने मित्राच्या पत्नीला मेसेज करून पुन्हा एकदा सेक्सची ऑफर दिली. यामुळे संतापलेली महिला अन्य एका तरुणीला घेऊन भाजप नगरसेवकाच्या मित्राच्या दुकानात पोहोचली. तिथे महिलेने आरोपीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी आरोपी नगरसेवकाने आणि त्याच्या मित्राने महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला मारहाण केली.
या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून नगरसेवक फरार आहे. तर त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.