मांजरी बुद्रुक येथे कोव्हीड सेंटर सुरू करण्याची मागणी

मांजरी – पुणे जिल्ह्यात हॉटस्पॉट असलेल्या मांजरी बुद्रुक गावात कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी मांजरी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण वाढत आहेत.

त्यामुळे कोविड पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना सध्या बेड मिळण्यासाठी अतिशय गैरसोय होत आहे. तेव्हा हद्दीमध्येच कोरोना रुग्णांची सोय व्हावी व कोरोना वाढीची चैन ब्रेक व्हावी या करिता गावात कोरोना कोविड सेंटर सुरु करण्याची परवानगी ग्रामपंचायतीने पालकमंत्री अजित पवार,जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व आरोग्य विभाग प्रशासनाकडे मागितली आहे.

येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची इंजिनिअरींग कॉलेजची इमारत अधिग्रहीत करुन मिळावी,तसेच ग्रामपंचायतीला ग्रामनिधीमधुन कोविड केअर सेंटर करिता रक्कम रुपये एक कोटी रुपये खर्च करण्यास परवानगी दयावी, ग्रामपंचायत मार्फत कोविड सेंटर सुरु केलेनंतर त्या ठिकाणी आवश्यक ऑक्सीजन,रेमडीसिवर

इंजेक्शन व आवश्यक औषधचा पुरवठा शासना मार्फत होईल या लेखी आदेश देण्यात यावा. तसेच जिल्हाधिकारी कार्याल्याकडुन महाराष्ट्र शासना मार्फत व जिल्हा परिषद स्तरावरुन कोविड
केअर सेंटर करिता कोणकोणत्या प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात यावी , अशी मागणीही ग्रामपंचायतीने पत्राद्वारे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद यांच्याकडे केली आहे.

सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत 20 एप्रिल पर्यंत 124 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत , याशिवाय दररोज 20 पेक्षा अधिक रुग्ण पॉझीटिव्ह येत आहेत. गावाच्या हद्दीत असलेली खासगी रुग्णालये याठिकाणी बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बेड मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

एवढे करूनही बेड उपलब्ध होत नाहीत. तेव्हा ग्रामपंचायत हद्दीतच कोव्ही ड केअर सेंटर उभारण्यासाठी परवानगी देऊन सहकार्य करावे,अशी मागणी पत्राद्वारे पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी व संबधीत विभागांना केली असल्याचे ग्रामपंचायतचे सरपंच शिवराज घुले यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.