पुणे – टेलर व्यवसायीक असलेल्या महिलेवर बलात्कार करुन धमकावत साडेनऊ तोळ्याचे दागिने लाटण्यात आले. यानंतर पिडीत महिलेच्या नावावर साडेपाच लाखाचे कर्ज काढून ती रक्कम लाटण्यात आली. याप्रकरणी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीसह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश जगन्नाथ सोनवणे(रा.पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी श्रध्दावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2012 ते 2019 दरम्यान घडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी 32 वर्षीय महिलेचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. आरोपी गणेशची पत्नी तीच्याकडे कपडे शिवण्यासाठी नेहमी जात होती. यातूनच त्यांची ओळख होऊन घरगुती संबंध निर्माण झाले. दरम्यान गणेशने पिडीत महिला त्याच्या घरी आल्यावर तीच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. याची काढलेली छायाचित्रे पती व सासरी दाखवेल अशी धमकी तीला दिली. यानंतर तीच्याकडू वेळोवेळी सहा तोळे सोन्याचे दागिने तसेच तीच्या नावावर पाच लाख 60 हजाराचे कर्ज काढून ती रक्कम स्वत: घेतली.
दरम्यान त्याने पिडीतेवर त्याच्या रहात्या घरी, खडकवासला येथील चैतन्य लॉज, स्वारगेट येथील कावेरी लॉज व सातारा रस्त्यावरील एलोरा लॉजमध्ये नेऊन अत्याचार केले. तर गणेशची पत्नी श्रध्दाने पिडीतेकडील साडेतीन तोळ्याचा सोन्याचा हार घेऊन अपहार केला. दोघांनीही तीला शिवीगाळही केली. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पवार करत आहेत.