वाघोली(प्रतिनिधी) : – वाघोली तालुका येथील पीएमआरडीए च्या विकास आराखड्यात वाघोलीतील इतर भागातील भागातील झोन बदली करण्यात आले असून जगताप वस्ती
ते फुलमळ्या पर्यंत भागात पुर्वीपासून शेती झोन असून तो तातडीने बदली करण्यात यावा व सदर ठिकाणी निवासी आरक्षण करण्यासाठी तातडीने पीएमआरडीए ला योग्य ती आदेश देण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी वाघोलीतील शेतकऱ्यांनी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधी संतोष हिरामण सातव यांनी दिली आहे.
याबाबत जगताप वस्ती ते फुल मुळापर्यंत भागात पुर्वीपासून शेती आरक्षण असून पीएमआरडीए च्या वतीने विकास आराखड्यात निवासी आरक्षित भूखंड करण्याची मागणी वाघोलीतील शेतकऱ्यांनी केली आहे.
पीएमआरडीए च्या विकास आराखड्यात वाघोलीतील इतर भागात निवासी आरक्षित भूखंड करण्यात आला असून त्याचप्रमाणे जगताप वस्ती व फुल मळा पर्यंत देखील हे आरक्षण लागू करावे अशी मागणी आमदार पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे याबाबतचे निवेदन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना देण्यात आले.
यावेळी माजी सरपंच शिवदास उबाळे, बाळासाहेब जगताप, विठ्ठल शिवरकर, गणेश जाधवराव, चिमाजी जगताप, कैलास जगताप, केरबा जगताप, किशोर सातव, दत्तात्रय जाधव, किसन जाधव, सुनील जाधवराव, ,बाळासाहेब शिंदे, दिलीप जगताप, गणेश सातव, गणेश जाधव, निलेश जगताप, मच्छिंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.