WPL Live Cricket Score, DC vs RCB Women’s Premier League 2024 : आज महिला प्रीमियर लीगचा १७ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात महिला प्रीमियर लीगचा 17 वा सामना लवकरच सुरू होईल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील.
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार मेग लॅनिंगने सांगितले की, तिचा संघ एका बदलासह या सामन्यात प्रवेश करेल. सदरलँडच्या जागी मारिझान कप परतली आहे. त्याचवेळी आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना म्हणाली की, तिच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. पॉइंट टेबलमध्ये दिल्ली दुसऱ्या तर आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यात चुरशीचा लढत होण्याची शक्यता आहे.
WPL 2024 ( #DCvRCB Match 17 ) : दिल्लीनं आरसीबीविरुद्ध टाॅस जिंकला, घेतला ‘हा’ निर्णय….
DC vs RCB : दोन्ही संघांचे Playing 11…
दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे, तितास साधू.
Your Teams for Tonight 🙌
Who is winning this folks? 🤔
Live 💻📱https://t.co/b7pHKEKqiN #TATAWPL | #DCvRCB pic.twitter.com/onvEUYThhP
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 10, 2024
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), दिशा कसाट, जॉर्जिया वेरेहम, सोफी मॉलिनक्स, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.
WPL 2024 : महिला प्रीमियर लीग दरम्यान ‘या’ 2 स्टार खेळाडूंवर मोठी कारवाई, देण्यात आली ‘ही’ शिक्षा…
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी यांच्यातील शेवटचा सामना हा हाई स्कोरिंग होता. 40 षटकात 363 धावा झाल्या. दिल्लीने हा सामना 25 धावांनी जिंकला. अशा परिस्थितीत दिल्लीकडून मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी आरसीबी या सामन्यात उतरेल.