शिक्रापूर- दिल्ली येथील जवाहर नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचे पडसाद ग्रामीण भागात उमटू लागले आहे. शिरूर तालुक्यात देखील राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करीत संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करीत शिक्रापूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. दिल्ली येथील जवाहर नेहरू विद्यापीठ येथे काही व्यक्तींनी विद्यापीठात येथे विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह काही विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यावर भ्याड हल्ला झाला आणि या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटू लागले असताना शिरूर तालुक्यात देखील या घटनेचा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सचिव हमीद पठाण, जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नागेश खळदकर, तालुकाध्यक्ष अमित गव्हाणे, उपाध्यक्ष ओम पुरोहित, कुमार गव्हाणे, सागर गव्हाणे, नितीन खळदकर, अजिंक्य काकडे यांसह आदी उपस्थित होते. यावेळी आमच्या मागण्यांबाबत शासकीय पातळीवर पाठपुरावा करावा, असे हमीद पठाण यांनी सांगितले.