नवी दिल्ली – अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 16 धावांनी विजय संपादित केला आहे. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सचा संघ 16 गुणासह क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचला आहे.
That's that from Delhi as the @DelhiCapitals win by 16 runs and are through to the Playoffs 😎💪 pic.twitter.com/KtxeYqEwUY
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2019
विजयासाठी 187 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 20 षटकांत 7 बाद 171 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलामीवीर पार्थिव पटेलने 20 चेंडूत 39 आणि विराट कोहलीने 17 चेंडूत 23 धावा करत चांगली सुरूवात करून दिली पण दोघेही बाद होताच त्यानंतर सलग तीन फलंदाज बाद झाल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची 5 बाद 111 अशी अवस्था झाली होती. गुरकिरत सिंह मान याने 9 चेंडूत 27 धावा केल्या. मार्कस स्टोइनिस याने 24 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या पण तो संघास विजय प्राप्त करून देण्यास अपयशी ठरला.
दिल्ली कॅपिटल्सकडून कगिसो रबाडा आणि अमित मिश्रा याने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि शेरफेन रूदरफोर्ड यांनी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीची निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने 20 षटकांत 5 बाद 187 धाव संख्येपर्यत मजल मारली. दिल्लीकडून फलंदाजीत श्रेयस अय्यरने 37 चेंडूत (2 चौकार आणि 3 षटकार) सर्वाधिक 52 धावा केल्या, तर शिखर धवन याने 37 चेंडूत (5 चौकार आणि 2 षटकार) 50 धावा केल्या. शेरफेन रूदरफोर्डने 13 चेंडूत नाबाद 28 तर अक्षर पटेलने 9 चेंडूत 16 धावा करत संघाची धावसंख्या 187 पर्यंत नेली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून युजवेंद्र चहलने 2 आणि उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.