देहूगाव – देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात घुसून प्रभारी मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांच्यासह कर्मचाऱ्यांना एकेरी भाषेत हातवारे करत बोलत धमकावल्याची घटना गुरुवारी(दि.20) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
रितेश शरद काळोखे हे मुख्य कार्यकारी यांच्या कार्यालयात घुसून हातवारे करीत मुख्याधिकारी निकम यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. यावेळी उपस्थित असणारे अधिकारी रामराव खरात, लेखपाल भांगे, अभियंता संघपाल गायकवाड, महेश वाळकेयांनादेखील धमकाविले. अशाप्रकारे धमकावत मानसिक व शारीरिक त्रास देणारा व्यक्ती कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो. त्यामुळे पोलीस सुरक्षा व एक सुरक्षारक्षक देण्यात यावा.तरच मी या कार्यालयात काम करू शकता.े तसेच या व्यक्तीला नगरपंचायत आवारात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करण्यात यावे, अशा विनंतीचे निवेदन मुख्याधिकारी यांनी दिले आहे. या घटनेनंतर आज (दि.21) सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवित एक दिवसीय सामूहिक रजेवर गेले.त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज ठप्प झाले होते.
नगरसेवक, कर्मचाऱ्यांकडून निषेध
नगरसेवकांच्या वतीने शुक्रवारी (दि.21) सकाळी नगरपंचायतीच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करीत नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, सभापती पोर्णिमा परदेशी पूनम काळोखे, गटनेते योगेश परंडवाल, नगरसेविका पूजा दिवटे कर्मचारी अक्षय रोकडे आदींनी मनोगतावेळी घटनेचा निषेध नोंदवित कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.