नवी दिल्ली – संरक्षण मंत्रालयाने 7965 कोटी रुपयांच्या लष्करी शस्त्रसामग्री खरेदीच्या प्रस्तावाला अनुमती दिली आहे. यात हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीकडून 12 हलक्या हेलिकॉप्टर खरेदीच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. संरक्षण सामग्री खरेदी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
यात जी अन्य सामग्री खरेदी केली जाणार आहे त्यात नौदल गनफायर कंटोल सिस्टिम, मिड लाईफ अपग्रेडेशन डॉनिअर एअरक्राफ्ट, अशा सामग्रीचा समावेश असून ही बहुतेक सामग्री भारतीय कंपन्याकडूनच खरेदी केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही सामग्री खरेदीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. ही सारी सामग्री मेक इन इंडिया तत्त्वानुसारच खरेदी केली जाणार आहे.