बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते; परंतु ड्रग्जप्रकरणी तिचे नाव समोर आल्यानंतर ती सोशल मीडियापासून काही काळासाठी दूर होती. आता एनसीबीच्या चौकशीनंतर दीपिकाने पहिल्यांदा सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून दीपिकाने प्रभासला बर्थडे विश केले आहे. दीपिका आणि प्रभास हे प्रथमच एका चित्रपटात काम करणार आहे. वैजयंती मूव्हिजच्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीही एन्ट्री झाली आहे. पण अद्याप या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आलेले नाही.
यापूर्वीही प्रोडक्शन हाउस वैजयंती मूव्हिजने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यात “महानटी’ या हिट चित्रपटाचा समावेश आहे. हा चित्रपट लेजेंडरी ऍक्ट्रेस सावित्री यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास दीपिका सध्या गोवा येथे शकुन बत्रा यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात दीपिकासोबत अनन्या पांडे आणि सिद्धार्थ चतुर्वेदी मुख्य भूमिका साकारत आहेत.