“पठाण’मध्ये शाहरुख बरोबर दिसणार दीपिका

झिरो नंतर तब्बल तीन वर्षांनंतर शाहरुखने “पठाण’च्या कामाला सुरुवात केली आहे. आता शाहरुखच्या “पठाण’मध्ये आता दीपिका पदुकोण देखील असणार आहे. शाहरुख प्रमाणे ती देखील सिक्रेट एजंटचा रोल साकारणार आहे, असे समजते आहे. अगदी अलीकडेच तिने या सिनेमासाठी थोडे म्हणजे दोन दिवस उपलब्ध करून दिले आहेत. शाहरुखचा “पठाण’ आणि शकुन बत्राच्या आगामी सिनेमामध्ये प्राधान्य कशाला द्यायचे, याबाबत तिचा निर्णय होत नाही आहे. 

आता ती डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा शाहरुख बरोबर “पठाण’च्या शूटिंगमध्ये सामील होईल. जानेवारी ते जून 2021 दरम्यान या सिनेमात ती शाहरुख बरोबर अनेक ऍक्‍शन सीन देखील करणार आहे, असे समजते आहे. कतरिना कैफने “टायगर…’मध्ये झोया ही एजंटची व्यक्‍तिरेखा केली होती. तशीच व्यक्‍तिरेखा दीपिकाला “पठाण’मध्ये साकारायची आहे.

“पठाण’मध्ये “टायगर’ बनून सलमान देखील छोटासा रोल करणार आहे, तर “पठाण’ झालेला शाहरुखही “टायगर 3’मध्ये दिसणार आहे, असेही समजते आहे. या दोघांनी मिळून हृतिकच्या “वॉर’ च्या सिक्‍वेलमध्येही हजेरी लावायची असे ठरवले असल्याचे समजते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.