मुंबई – ‘दीया और बाती हम’ या मालिकेतून चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप मारलेली अभिनेत्री दीपिका सिंह सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्या अंदाजात दिसल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नुकतंच अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौत्के चक्रीवादळ गुजरातला धडकलं असलं तरी महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम झालाच. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील किनारपट्टी भागाला याचा जास्त फटका बसला. आता हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनी सरकलं आहे.
या वादळात मुंबईतील अनेक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. या वादळामुळे मुंबईत बऱ्याच ठिकाणी झाडं उन्मळून पडली असून, बैठ्या घरांवरचे पत्रे उडालेत. अशा परिस्थितीत सुंदर अभिनेत्री दीपिका सिंहने या वादळी पावसाचा मनमुराद आनंद कसा लुटला, हे पहाणं रंजक ठरतं आहे.
https://www.instagram.com/p/CPARk2uhj9O/?utm_source=ig_web_copy_link
या वादळातल्या पावसातही दीपिकासिंहने घराबाहेर येऊन स्वत: चा व्हिडीओ बनविला आणि काही फोटोही काढलेत. अभिनेत्रीच्या या व्हिडीओमध्ये एक झाड रस्त्यावर पडलेलं दिसत असून, ती मनसोक्त नाचताना पाहायला मिळतेय. तसेच व्हिडीओ शूट करताना तिनं अनेक थरारक पोझेस दिल्या आहेत.
या फोटोमध्ये ती मस्त फ्रेश दिसतेय. ‘आपण वादळाला शांत करू शकत नाही, त्यामुळे प्रयत्न करणं थांबवा.’ असं सुंदर कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. एवढंच नाही तर तिनं पावसात मस्त ठेकाही धरला. पावसात डान्स करतानाचा एक व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपिका सिंगची ही शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.
हा आग लावणारा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय. तिचा हा व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.