Entertainment | सध्या अभिनेत्री जान्हवी कपूर तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय राजकुमार रावही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी जान्हवीने क्रिकेट शिकण्यासाठी खूप मेहनत घेतली. अलीकडेच एका मुलाखतीत तिने बालपणीच्या दिवसांशी संबंधित एक आश्चर्यकारक किस्सा सांगितला, जो ऐकून प्रत्येकजण थक्क होईल.
जान्हवी कपूरने करण जोहरसोबतच्या संभाषणात सांगितले की, एकदा तिचे काही फोटो पोर्नोग्राफी वेबसाइटवर अपलोड करण्यात आले होते. या संभाषणाचा व्हिडिओ धर्मा प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे, ज्यामध्ये जान्हवीने सांगितले की, ती तिच्या आई-वडिलांसोबत एका कार्यक्रमाला गेली होती. त्यावेळी तिचे वय सुमारे 12 किंवा 13 वर्षे होते. त्या कार्यक्रमात जान्हवीचे काही छायाचित्रे काढण्यात आली. जान्हवीच्या म्हणण्यानुसार, नंतर कोणीतरी ती छायाचित्रे पोर्नोग्राफीसारख्या वेबसाइटवर अपलोड केली.
जान्हवी कपूरने सांगितले की, ‘त्यावेळी सोशल मीडियाचा ट्रेंड नुकताच सुरू झाला होता. माझ्या शाळेतील मुलांनीही ते फोटो पाहिले होते आणि माझी खिल्ली उडवली होती.’
दरम्यान, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ 31 मे रोजी रिलीज होणार आहे. जान्हवीने आणखी एका संवादात सांगितले होते की, ‘चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिने कठोर प्रशिक्षण घेतले होते. यावेळी त्यांच्या दोन्ही खांद्याला दुखापत झाली. या चित्रपटाचे शूटिंग जवळपास दोन वर्षे चालले.