Kiara Advani Cannes Look| ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024’मध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकरांनी हजेरी लावली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या रायने देखील येथे हजेरी लावली असून तिच्या मनमोहक लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 14 मे पासून सुरू झालेले हे फेस्टिवल 25 मे पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमातील सेलिब्रिटींचे जबरदस्त लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातच आता अभिनेत्री कियारा आडवाणीने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पदार्पण केले आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा आडवाणीने सोशल मीडियावर अपडेट देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडीओ कियारा आडवाणीच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये कियारा आडवाणी वाइट साटन गाऊनमध्ये दिसत आहे. लोकप्रिय फॅशन डिझायनर प्रबल गुरुंगने हा लूक डिझाईन केला होता. कान्समध्ये रेड सी फिल्म फाऊंडेशन वीमेन इन सिनेमाच्या गाला डिनरमध्ये कियारा भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. Kiara Advani Cannes Look|
View this post on Instagram
कियारा आडवाणीने 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फगली’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण 2016 साली प्रदर्शित झालेल्या ‘एम.एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिला चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर तिने कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नबंधनात अडकली आहे. ‘शेरशाह’ या चित्रपटात देखील दोघांनी एकत्र काम केले आहे.
ऐश्वर्याच्या लेकीचे होतेयं कौतुक
दरम्यान, कान्सच्या रेड कार्पेटवरून ऐश्वर्या रायचे अनेक फोटो समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ऐश्वर्याच्या एका हाताला दुःखापत झालेली दिसून येत आहे. अशावेळी लेक आराध्या तिच्या आईला आधार देत आहे. या दरम्यानच्या फोटो आणि व्हिडिओवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आराध्यावर कौतुकाचा वर्षाव केला. Kiara Advani Cannes Look|
हेही वाचा :