मुंबई – अभिनेत्री दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील इतर नट्यांपेक्षा वेगळी ओळख असलेली अभिनेत्री आहे, चित्रपटाच्या निमित्ताने अनेकदा ती आपलं स्पष्ट मत मांडताना डिप्रेशनबाबत बोलताना दिसून येते. असं वारंवार झालं आहे की,दीपिका डिप्रेशनबाबत मनमोकळेपणाने बोलताना दिसली आहे. तिने याबाबत वारंवार याबाबत भाष्य केल्यावर तर अनेकदा ती पेड प्रमोशन तर करत नाही ना असा संशय अनेकांना येतो मात्र यावर आता स्वतः दीपिकाने खुलासा केला आहे.
अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल होस्ट करत असलेल्या ‘मेघन : डचेस ऑफ सक्सेस या शोमध्ये दीपिका नुकतीच दिसली. यावेळी तिने आपल्या कुटुंबीयांनी डिप्रेशनच्या काळात खूप मदत केल्याचे सांगितले. तसेच डिप्रेशन हा एक आजार असून तुम्ही त्यावर मात करू शकता असंही ती म्हणाली. तसेच ती हे ही म्हणाली की ज्यावेळी ती अशा आजाराबाबत भाष्य करते त्यावेळी ती खोट बोलत आहे कि काय असं काही लोकांना वाटत.
पुढे ती म्हणते,”यासंबंधीच माझं बोलणं प्रमोशन असल्याचे देखील अनेकांना वाटत असते, काही लोकांना तर कोणत्या तरी औषधांच्या कंपनीने मला हे सगळं बोलण्यासाठी पैसे दिले आहेत, असंही वाटायचं” असं दीपिकाने यावेळी सांगितले.परंतु डिप्रेशन दरम्यान कुटुंबाची खूप मदत झाल्याचे देखील दीपिकाने स्पष्ट केले. सध्या दीपिका-रणवीर ही बॉलिवूडमधील सर्वात फेमस जोडी आहे.