मुंबई – बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले आहे. तिच्या सौंदर्याची केवळ देशातच नाही तर जगभरात चर्चा झाली आहे, ज्यामुळे तिचा जगातील टॉप 10 सुंदर महिलांच्या यादीत समावेश झाला आहे. दीपिका ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे जिने टॉप 10 सुंदर महिलांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
डॉक्टर ज्युलियन डी सिल्वा या शास्त्रज्ञाने ही यादी तयार केली आहे. त्यानुसार, सुवर्ण गुणोत्तरानुसार सौंदर्य मोजले जाते. यामध्ये, चेहऱ्याचे सौंदर्य मोजले जाते आणि 1.618 (Phi) शी तुलना केली जाते. अहवालानुसार, ‘गोल्डन रेशो ऑफ ब्युटी’, ज्याला फी म्हणूनही ओळखले जाते, ही एक गणितीय पद्धत आहे ज्यामध्ये शारीरिक परिपूर्णतेचे सूत्र लागू केले जाते.
या यादीत जोडी कोमरचे वर्णन जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून करण्यात आले आहे. जोडी कॉमर ही हॉलिवूड अभिनेत्री आहे. गायिका आणि अभिनेत्री झेंडया दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमेरिकन मॉडेल बेला हदीद तिसर्या क्रमांकावर आहे. अमेरिकन गायिका, गीतकार आणि अभिनेत्री बियॉन्से चौथ्या क्रमांकावर आहेत. पाचव्या क्रमांकावर एरियाना ग्रांडे, सहाव्या क्रमांकावर टेलर स्विफ्ट आहे.
अमेरिकन पॉप गायक जॉर्डन डन सातव्या क्रमांकावर आहे. किम कार्दशियनला आठवे आणि दीपिका पदुकोणला नववे स्थान मिळाले आहे. तर दक्षिण कोरियाची अभिनेत्री आणि मॉडेल होयोन जुंग हिला 10 वे स्थान मिळाले आहे.
दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे सध्या एकापेक्षा एक चित्रपट आहेत. ‘पठाण’ या चित्रपटात ती बॉलिवूडचा किंग खान ‘शाहरुख खान’सोबत दिसणार आहे. ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्येही दीपिका दिसणार आहे. याशिवाय ती प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत या चित्रपटात दिसणार असून हृतिक रोशनसोबत ती ‘फाइटर’चा एक भाग आहे.