मुंबई – बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते; परंतु ड्रग्जप्रकरणी तिचे नाव समोर आल्यानंतर ती सोशल मीडियापासून काही काळासाठी दूर होती. आता एनसीबीच्या चौकशीनंतर मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरीच ड्रग्ज सापडले आहेत. तिच्या घरातून 1.8 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळतं आहे. करिश्माला आता चौकशीसाठी पुन्हा समन्स पाठवण्यात आला आहे. त्यांनी पुढे सांगितलं, “करिश्मा प्रकाशला समन्स बजावलं आहे.
यातच मिळलेल्या माहितीनुसार, एनसीबीने तिला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा समन्स पाठविला होता. मात्र, दोनदा समन्स पाठवूनही करिश्मा या चौकशीला हजर राहिली नाही. यामुळे एनसीबीने तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. करिश्मा गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याचा दावा केला जात आहे. यानंतर पुन्हा एकदा एनसीबीच्या चौकशीत अडकण्याची भीती वाटल्याने दीपिकाने तिला थेट कामावरूनच काढून टाकले आहे. करिश्माने स्वतःहून राजीनामा दिला असला तरी दीपिकानेच तिला काढल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, रिया प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर्सच्या चौकशीत करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं तिच्या घरावर छापा टाकला. तेव्हा तिच्या घरात ड्रग्ज सापडले आहेत.