मुंबई : विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, या निवडणुकीनंतर सर्वात मोठा धक्का शिवसेनेला बसणार असल्याचे बोलले जात आहे. कारण शिवसेना नेते एकनाथ शिंदे आपल्या काही समर्थक आमदारांसह नॉटरिचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरून शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून दिपाली सय्यद यांनी देखील ट्वीट केलं आहे.
माननीय.एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणनार्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मिडीयावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही. @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) June 21, 2022
दिपाली सय्यद यांनी ट्विट केले आहे की,’माननीय…एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणनार्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मिडीयावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही.’ असं म्हणत सय्यद यांनी भाजपला सुनावले आहे .
दरम्यान, शिवसेनेत फूट पडत असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे 11 आमदारांसह सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांनी रात्री उशिरा भाजपच्या एका नेत्यासोबत बैठक घेतली असल्याचे म्हटले जात आहे.