नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे दिल्ली सराफात बुधवारी सोन्याचा दर 216 रुपयांनी कमी होऊन 47,010 रुपये प्रति 10 ग्रॅम झाल्याचे दिसून आले.
दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 179 रुपयांनी कमी होऊन 61,348 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. याबाबात बोलताना एचडीएफसी सिक्युरीटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात डॉलर काही प्रमाणात बळकट झाल्यामुळे सोन्याचा दर कमी झाला.
जागतिक बाजारात पुढील काही दिवस सुट्ट्या असल्यामुळे सोन्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.