भिवंडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 39 वर

ठाणे – भिवंडी येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 39 झाली आहे. काल रात्रीत तेथे आणखी 14 मृतदेह ढिगारा उपसताना आढळून आले आहेत.

मृतांमध्ये पंधरा लहान मुलांचा समावेश आहे. ही मुले 2 ते 15 वयोगटातील आहेत. मदतपथकांनी ढिगाऱ्या खाली अडकलेल्या 25 जणांना तेथून वाचवले आहे. मात्र, ते बऱ्यापैकी जखमी असल्याने त्यांना भिवंडी आणि ठाण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

काल रात्री तुफान पावसातही या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम मदत पथके करीत होती. रात्री जे मृतदेह तेथे सापडले ते सुमारे 50 तास या ढिगाऱ्याखाली अडकलेले असल्याने त्या मृतदेहांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.

43 वर्षे जुनी असलेली जिलानी नावाची ही इमारत सोमवारी पहाटे 3.40 च्या सुमाराला कोसळली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.