तेहरान – आधुनिक काळामध्ये मद्यपान करणे हे फारसे चुकीचे मानले जात नसले तरी आणि पार्टी कल्चरच्या निमित्ताने मद्यपानाला प्रतिष्ठा निर्माण झाली असली तरी जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत जेथे मद्यपानाच्या विरोधात कडक कायदे अमलात आणण्यात आले आहेत इराण सरकारने व्यसनाधीनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत कडक कायदे केले असून मद्यपान करणाऱ्याला फाशीची शिक्षाही दिली जाऊ शकते इराण हा इस्लामिक देश असल्याने तेथील नागरिकांना मद्यपान करण्याची परवानगी दिली जात नाही.
तरीसुद्धा जर लपून छपून कोण मद्यपान करत असेल तर या गुन्ह्यासाठी त्याच्यावर कारवाई करण्यात येते आणि त्याला तुरुंगात पाठवण्यात येते पण अशाच प्रकारचा गुन्हा जर त्याने चार वेळा केला तर त्याला फाशीची शिक्षाही दिली जाऊ शकते इराणमध्ये असे अत्यंत कडक कायदे असल्यानेच बेकायदेशीरपणे मद्य निर्मिती करणे आणि त्याची विक्री करणे हे उद्योगही सध्या तेथे फोफावले आहेत आधुनिक काळातील इराणी युवकाला मद्यपानाचा कोणताही विधीनिषेध नाही या तरुण लोकांना डोळ्यासमोर ठेवूनच ही बेकायदेशीर मद्याची बाजारपेठ तयार करण्यात आली आहे.
पण इराण सरकारचे त्याच्यावरही लक्ष असून बेकायदेशीरपणे मद्य निर्मिती करणारे किंवा मद्यविक्री करणारे आणि मद्य सेवन करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे अन्य देशांमधून मद्याची तस्करीही करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये इराणमध्ये वाढले आहे त्यावरही इराणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे एखादी व्यक्ती मद्यपान करताना आडवी किंवा मद्य विक्री करताना आढळी तर त्याला अटक करून तुरुंगात पाठवले जाते आणि चाबकाचे 80 फटके मारण्याची शिक्षाही त्याला सुनावण्यात येते.
अशाच प्रकारचा गुन्हा जर त्याने चार वेळा केल्याचे नजरेस आले तर त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूदही इराणच्या कायद्यात करण्यात आली आहे इराणमध्ये असे कायदे असूनही बेकायदेशीरपणे नकली दारू निर्माण केली जात असल्याने त्याचा फटका अशा मद्याचे सेवन करणाऱ्या ग्राहकांनाही बसला आहे गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये विषारी आणि नकली मद्यप्राशन केल्यामुळे 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.