वाघोली : वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या 14 जुलै 2023 रोजी हॉटेल सीजन्स 24, वाघोली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुढील एक वर्षांसाठी 2023 ते 2024 सालासाठी पुढील डॉक्टरांची सर्वानुमते सर्व 223 सदस्यांनी एकमताने निवड करण्यात आली आहे, अशी माहिती असोसिएशनचे संस्थापक डॉ. विनोद सातव पाटील यांनी दिली.
वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी केअर हॉस्पिटलचे डॉ भूषण विधाते, सचिवपदी डॉ मच्छिंद्र काशिद, कोषपाल डॉ नितीन पवार, उपाध्यक्ष डॉ बंडू कराळे आणि डॉ हेमंत विभुते, सहसचिव डॉ अतुल जाधव, सहकोषपाल डॉ राहुल शिंदे, तसेच विविध कमिटीवर विविध डॉक्टरांची निवड करण्यात आली.
सोशियल आणि सांस्कृतिक कमिटी – डॉ चेतन कोलते, डॉ लक्ष्मीकांत बेहेळे, डॉ पल्लवी मेहेरे, डॉ वैशाली जायकर, डॉ सायली भुजबळ.
स्पोर्ट्स कमिटी – डॉ ज्ञानेश्वर खरात, डॉ विजयकुमार गुट्टे, डॉ कपिल जुमले, डॉ प्रवीण काकडे.
मेडीकोलिगल कमिटी – डॉ रघुनाथ रामकर, डॉ शंकर वावरे, डॉ चेतन जायकर, डॉ दीपक नरनवरे.
वुमेन्स फोरम – डॉ दाफिया चिंचाणीकर, डॉ घनश्री शिंदे, डॉ रुचा कोलते, डॉ ज्योती जाधव.
असोसिएशनचे हे बारावे वर्ष असून 223 सदस्यसंख्या आहे. असोसिएशनच्या माध्यमातून वेगवेगळे सिएमई, आरोग्यशिबिरे, डॉक्टर्स डे, स्पोर्ट्स व सांस्कृतिक कार्यक्रम, बोगस डॉक्टर पकडून देणे, सहली यांचे आयोजन केले जाते.