चुकून फाशीची शिक्षा जाहीर ! दोन कैद्यांना 75 दशलक्ष डॉलरची भरपाई

राले (नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका),  – चुकून फाशीची शिक्षा ठोठावलेल्या दोन कैद्यांना नॉर्थ कॅरोलिनातील एका कोर्टाने तब्बल 75 दशलक्ष डॉलरची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 

हे दोन्ही कृष्णवर्णीय कैदी एकमेकांचे सावत्र बंधू असून, त्यांच्यावर 11 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्येचा आरोप होता. या दोघांना 1983 मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली गेली होती. त्यानंतर गेली 31 वर्षे हे दोघेही तुरुंगातच होते. मात्र, त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा चुकून सुनावली होती, असे लक्षात आल्यावर 8 सदस्यांच्या ज्युरी पॅनेलने या दोघांनाही प्रत्येकी 31 दशलक्ष डॉलरची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 

तुरुंगात काढलेल्या प्रत्येक वर्षासाठी 1 दशलक्ष डॉलर याप्रमाणे ही भरपाई आणि 13 दशलक्ष अतिरिक्‍त भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले. हेन्री मॅकलम आणि लिओन ब्राउन अशी या दोघांची नावे आहेत.

या दोघांविरोधातील पुरावे नकली होते. हे पुराव्यांची छाननी केल्यानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे हे दोघेही निर्दोष असल्याचे स्पष्ट होते आहे, असे रालेचे ऍटर्नी इलियट अब्राम म्हणाले. या दोघांवर न्यायालयीन चुकीमुळे मोठा अन्याय झाला आहे. ही चूक दुरुस्त करण्यासाठी यांना मोठी भरपाई देणे न्याय्य असल्याचे अब्राम यांच्या नेतृत्वाखालील ज्युरी पॅनेलने म्हटले आहे.

2014 मध्ये दोघांना डीएनए पुराव्यांनंतर सोडण्यात आले होते. एका दोषी मारेकऱ्याने त्यांची क्षमा मागितली होती. रोबेसन काउंटीच्या रेड स्प्रिंग्जमध्ये घडलेल्या या गुन्ह्याच्यावेळी ते किशोरवयीन होते. हे दोघेही मतिमंद असल्यामुळे पोलिसांच्या दबावापुढे त्यांनी कबुलीजबाब दिला होता. त्यानंतर 2015 पासून आपल्याविरोधातील अन्याय करणाऱ्या ज्युरींविरुद्ध मॅकलम आणि ब्राऊन यांनी दिवाणी खटला चालविला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.