लंडन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ वर्षी निधन झाले. बंकिंगहम पॅलेसने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे. त्यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारीअखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती खराब होती आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. मागील ७० वर्षांपासून त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. १९५२ मध्ये त्या पदावर आल्या होत्या.
दरम्यान त्यांच्या शेवटच्या क्षणी राजपरिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. ब्रिटीश राजघराण्याकडून आणि ब्रिटन सरकारकडून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला आहे. एलिझाबेथ यांच्या पश्चात चार अपत्ये, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या गादीवर बसतील.
I had memorable meetings with Her Majesty Queen Elizabeth II during my UK visits in 2015 and 2018. I will never forget her warmth and kindness. During one of the meetings she showed me the handkerchief Mahatma Gandhi gifted her on her wedding. I will always cherish that gesture. pic.twitter.com/3aACbxhLgC
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले असून ते म्हणाले, “२०१५ आणि २०१८ मध्ये झालेल्या ब्रिटनच्या माझ्या दौऱ्यात महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या भेटीच्या आठवणी अविस्मरणीय आहेत. मी त्यांचा दयाळूपणा कधीही विसरू शकणार नाही. एका भेटीत त्यांनी महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात दिलेला रुमाल दाखवला होता. ते माझ्या कायम लक्षात राहील.”
बंकिगहम पॅलेसने जारी केलेले प्रसिद्धीपत्रक
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिओ गटर्स म्हणाले, “महाराणी एलिझाबेथ द्वितीय संयुक्त राष्ट्राच्या खूप चांगल्या मित्र होत्या. त्यांनी न्यू यॉर्कच्या संयुक्त राष्ट्र मुख्यालयाला दोनदा भेट दिली होती. त्यांचा अनेक पर्यावरणीय आणि सामाजिक कामांमध्ये सहभाग होता. ग्लासगो येथे त्यांनी पर्यावरणीय बदलावरही भाष्य केलं होतं. त्यांच्या निधनाने मी दुःखी आहे.”
A statement from His Majesty The King: pic.twitter.com/AnBiyZCher
— The Royal Family (@RoyalFamily) September 8, 2022
विशेष म्हणजे नुकतीच महाराणी एलिझाबेथ यांनी ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिज ट्रस यांची नियुक्ती केली होती. एलिझाबेथ द्वितीय यांच्या कार्यकाळात त्यांनी एकूण १५ पंतप्रधानांची नियुक्ती केली. यात विस्टन चर्चिल यांच्यापासून लिज ट्रस यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे.