- 80 नवीन करोनाबाधित
- 75 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – करोनामुळे शहरातील तीन व शहराबाहेरील एक अशा चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात 80 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 75 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शहरामध्ये आजपर्यंत 97035 जणांना करोनाची लागण झाली आहे.
सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 75 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 5 जणांना करोनाची लागण झाली. तसेच आज दिवसभरात 4 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 3 व शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. आज शहरातील प्राधिकरण, भोसरी व चिंचवड येथील 3 व शहराबाहेरील शिरोली बुद्रक येथील एकाचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2496 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1762 तर शहराबाहेरील 734 रुग्णांचा समावेश आहे.
आज दिवसभरात 75 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 93730 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1747 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1618 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 653 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 890 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1543 इतकी आहे.