कोलकाता – भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
गांगुली यांच्यावर आणखी एक ऍन्जिओप्लास्टी करण्यात येणार होती. पण ती सध्या लांबणीवर टाकण्यात येत असल्याची माहिती, असे वुडलॅंड हॉस्पिटलच्या सीईओ रुपाली बासू यांनी सांगिीतले आहे.
गांगुली यांच्यावर उपचार करण्यासाठी नऊ सदस्यीय वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती रुपाली बासू यांनी दिली. कार्डिऍक सर्जन्स देवी शेट्टी, रमाकांत पांडा, कार्डिओलॉजिस्ट सॅम्युल मॅथ्युज, सामीन शर्मा, कार्डिओलॉजिस्ट अश्विन मेहता यांची मते झूम ऍप तसेच फोनच्या माध्यमातून जाणून घेण्यात येत आहेत.
तज्ज्ञांच्या बैठकीत गांगुलीच्या ह्रदयातील आणखी दोन ब्लॉकेजेस बद्दलही चर्चा करण्यात आली असून ऍन्जिओप्लास्टी लांबणीवर टाकणे हा सध्याच्या घडीला सुरक्षित पर्याय आहे यावर तज्ज्ञांचे एकमत झाले. आता गांगुली यांची प्रकृती स्थिर आहे.