मुंबई – रायगड किल्ल्यावर एका शिवप्रेमीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. रमेश गुरव असे या पर्यटकाचे नाव असून, ते मुंबईहून किल्ले रायगडावर आपल्या मित्रपरिवारासह गेले होते.
मुंबईतील विद्याविहार येथे रमेश गुरव राहतात. आठ जणांचा हा गट किल्ले रायगडावर दिवाळीनिमित्त पणत्या लावण्यासाठी निघाला होते. गडाच्या पायऱ्या चढत असताना अचानक गुरव यांची प्रकृती बिघडली.
त्यानंतर त्यांना जवळच्या पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच रमेश गुरव यांचा मृत्यू झाला.