शिराळा ( प्रतिनिधी ): शिराळा येथील एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जिन्यावरून उडी मारून नागरिकाने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. अमीर करीम् मोमीन असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
आमिर हे मंगळवारी उदगाव कोल्हापूर येथून शिराळ्यात आले होते. त्यामुळे त्यांना संस्था विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र अचानक गुरुवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यावेळी त्यांचा पाय घसरून अपघाती मृत्यू झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यांचे शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर योगिता माने यांनी शवविच्छेदन केले. यामध्ये डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. त्याची नोंदही पोलीस ठाण्यात झालेली होती.
यानंतर मात्र प्राथमिक तपास व तेथील माहिती व सर्व पुरावे तपासल्यानंतर अमीर यांनी जिन्यावरून उडी मारली. त्यामुळे डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम झालीआणि त्याचमुळे त्यांचा मृत्यू झाला, असे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिली . मात्र या प्रकरणात आत्महत्या असेल तर आत्महत्येचे कारण, याचा पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवलदार व्ही व्ही रजपुत करीत आहेत.