DC vs CSK : दिल्लीने दिलेल्या 192 रन्सच्या आव्हानाचा सामना करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली.अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त एका बॅट्समनला म्हणावी अशी चांगली कामगिरी करता आली नाही. दमदार बॅटिंग आणि चांगल्या बॉलिंगच्या जोरावर दिल्लीने चेन्नईवर 20 रन्सने मात करत आयपीलमधील पहिला विजय मिळवला.
दिल्लीच्या खलील अहमदने दमदार बॉलिंग करत चेन्नईला पहिल्या तीन ओव्हर्समध्येच दोन मोठे धक्के दिले. ओपनर ऋतुराज गायकवाड (१) आणि रचीन रवींद्र (२) हे लगेच तंबूत परतले.
यानंतर मैदानात आलेल्या अजिंक्य रहाणे आणि डेरील मिचल्स संयमी खेळी करत टीमचा स्कोअर ५० पार पोहचवला. त्याबदल्यात चेन्नईने दहा ओव्हर्समध्ये दोन विकेट्स गमावत बोर्डावर ७५ रन्स लावले होते. | DC vs CSK
अजिंक्य रहाणेचे अर्धशतक हुकले
अजिंक्य रहाणे दमदार फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने चेन्नईला संकटातून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली आणि झपाट्याने अर्धशतकाकडे वाटचाल केली. मात्र, तो चुकला. 14 व्या षटकात मुकेश कुमारने त्याला (45) बाद केले.
या ओव्हरमध्ये फिरली मॅच
मुकेशने 14 व्या ओव्हरमध्ये रहाणे आणि रिझवीला बॅक टू बॅक आऊट करत चेन्नईसमोरचे संकट आणखी वाढवले.
धोनीची तुफानी खेळी
महेंद्रसिंग धोनीने 16 चेंडूंचा सामना करत 37 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि तीन षटकार आले. मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
CSK ला 20 षटकात 6 गडी गमावून 171 धावा करता आल्या. दिल्लीने हा सामना 20 धावांनी जिंकला.
दिल्लीचे दमदार कमबॅक
तत्पूर्वी डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईसमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. मथिशा पाथिरानाने तीन विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने ताशी 145 किमीपेक्षा जास्त वेगाने केलेली गोलंदाजी चांगलीच लक्षवेधी ठरली. | DC vs CSK
पंतला सूर गवसला
मिरॅकल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऋषभ पंतने चेन्नईविरुद्ध दमदार कामगिरी केली. त्याने 31 चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. मैदानात परतल्यानंतर त्याचे हे पहिले अर्धशतक आहे, फिफ्टी केल्यानंतर तो लगेच पॅव्हेलियनमध्ये परतला. | DC vs CSK