दावडीकरांचा पाणीप्रश्‍न मिटला

वाघदरा पाझर तवाल ‘फुल्ल’

दावडी – येथील लोणकरवाडी वाघदरा पाझर तलाव हा पूर्ण क्षमतेने भरला आहे. हा तलाव मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पूर्ण क्षमतेने भरला नव्हता; मात्र आता हा तलाव पूर्ण भरल्याने शेतकऱ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दावडी गावाचा पाणीप्रश्‍न मिटला आहे.

दर वर्षी हा तलाव ऑक्‍टोबर महिन्यामध्ये जेमतेम भरत असतो; मात्र यावर्षी चांगला पाऊस पडल्याने ऑगस्टच्या मध्यातच पूर्ण क्षमतेने भरला आहे. शेतकरी बांधवांनी आनंद व्यक्‍त केला आहे. मागील दोन वर्षां पूर्वी या तलावाचे खोलीकरण आणि रूंदीकरणाचे काम केल्याने तलावाची पाणीसाठा क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. या तलावामुळे दावडी भागातील अनेक शेतकऱ्यांनची शेती ओलिताखाली येत आहे.

“दावडी गावातील तळे , तलाव ऑगस्ट महिन्यामधेच पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनच्या शेती व ग्रामस्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटलेला आहे.
– आत्माराम डुंबरे पाटील, पोलीस पाटील, दावडी

उन्हाळ्यापर्यंत पाण्याचे योग्य नियोजन केल्यास याचा फायदा येथील शेतकरी व ग्रामस्थांना होणार. पुढील वर्षीही तलावाचे रूंदीकरणाचे, खोलीकरणाचे काम करून तलावाचा पाणीसाठा आणखी वाढवण्यात येणार असल्याचे संतोष लोणकर, अजय लोणकर, संतोष तिकांडे, दीपक लोणकर, माणिक लोणकर, सुनील लोणकर, संजय मेंड, प्रताप लोणकर, दीपक घारे, संभाजी घारे यांनी सांगितले.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×