David A Lindon | The World’s Greatest Micro Artist : कोणताही चित्रकार सहसा मोठ्या कॅनव्हासवर चित्र काढून ते सहजासहजी सर्वांना पाहता येईल अशा प्रकारे त्याची रचना करत असतो. पण इंग्लंडमध्ये असा एक चित्रकार आहे, ज्याची चित्रे पाहण्यासाठी तुम्हाला दुर्बिणीचा म्हणजेच मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो.
‘डेव्हिड लिंडन’ नावाच्या या प्रख्यात चित्रकाराने यापूर्वीसुद्धा अतिसूक्ष्म चित्रे काढली होती. आता आपल्या नव्या प्रकल्पामध्ये त्याने अतिशय लहान आकारांमध्ये प्राण्यांची चित्रे काढली असून त्याने या प्रकल्पाला ‘ॲनिमल झू’ असे नाव दिले आहे. ।David A Lindon | The World’s Greatest Micro Artist
डेव्हिडने काढलेली ही सर्व चित्रे एवढी सूक्ष्म आहेत की, ती पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचाच वापर करावा लागतो टाचणीचे किंवा सुईचे टोक किंवा अशाच छोट्या आकाराच्या पृष्ठभागावर डेव्हिडने ही सर्व चित्रे काढली आहे.
लंडनमध्ये सध्या या चित्रांचे प्रदर्शन भरले असून या प्रदर्शनामधील सर्वात सूक्ष्मचित्र एका पेंग्विनचे आहे जे एका सुईच्या टोकावर काढण्यात आले आहे. एका ब्लु देवमाशाचे चित्र सुद्धा एका टाचणीच्या टोकावर काढण्यात आले आहे. ।David A Lindon | The World’s Greatest Micro Artist
अशा प्रकारची चित्रे काढणे ही अतिशय खडतर प्रक्रिया असून थोडीशी चूक सुद्धा संपूर्ण चित्र खराब करू शकते अशी माहिती चित्रकार डेव्हिड यांनी दिली आहे. एवढ्या सूक्ष्मपणे चित्र काढण्याची प्रक्रिया अतिशय आव्हानात्मक आणि कंटाळवाणी वाटते पण जेव्हा एखादी कलाकृती पूर्ण होते तेव्हा मात्र माझ्या मनातील आनंद उच्च पातळीला पोचलेला असतो, अशी माहिती त्याने दिली आहे.