MI vs RR Live Score : आज IPL 2024 चा 14 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. वानखेडेवर होणाऱ्या या मॅचमध्ये राजस्थानने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पहिला विजय मिळवण्याचे मुंबईचे लक्ष्य असेल.
काय सांगते आतापर्यंतची आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील स्पर्धा खूप जुनी आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई आणि राजस्थानचे संघ २७ वेळा आमनेसामने आले आहेत. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे वर्चस्व दिसून आले, त्यांनी 15 सामने जिंकले. राजस्थानचा संघही मागे नसून त्यांच्या नावावर 12 विजय आहेत. आता आयपीएलच्या 17 व्या सिजनमध्ये हे दोन संघ प्रथमच भिडतील. | MI vs RR
प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स
इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वान माफाका.
राजस्थान रॉयल्स
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.
Match 14. Rajasthan Royals Won the Toss & elected to Field https://t.co/XL2RWMFLbE #TATAIPL #IPL2024 #MIvRR
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2024
ऋषभ पंतला 12 लाखांचा दंड ! ‘ती’ एक मोठी चूक पडली महागात
माजी नेत्याला धमकावल्याने आमदाराविरोधात FIR ! भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर