Koffee With Karan : करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो कॉफी विथ करण सीझन 8 मध्ये दीपिका पदुकोणपासून ते झीनत अमानपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते. होस्टसोबत कॉफी सोफ्यावर बसून, स्टार्सनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर चर्चा केली.आता या शोचा शेवटचा भाग येणार आहे, ज्यामध्ये औरी उर्फ ओरहान अवत्रामणी, तन्मय भट्ट, दानिश सैत, सुमुखी सुरेश आणि कुशा कपिला पाहुणे म्हणून दिसणार आहेत. या शोमध्ये ऑरीने आपल्या डेटिंग लाइफबद्दल मोकळेपणाने सांगितले.
सोशल मीडिया सेन्सेशन ऑरी उर्फ ओरहान अवत्रमणी या प्रसिद्ध टॉक शोमध्ये दिसणार आहे. यादरम्यान त्याने करणसोबत त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही चर्चा केली. खरंतर, जेव्हा करण जोहरने औरीला विचारलं की तू कोणाला डेट करत आहेस का?यावर ऑरीने उत्तर दिले, “मला हा प्रश्न वारंवार विचारला जातो.” मागच्या वेळी मला विचारण्यात आले तेव्हा मी म्हणालो की मी जुन्या पद्धतीचा माणूस आहे. मी कोणालाच पाहत नाही, मला फक्त खूप श्रीमंत व्यक्तीशी लग्न करायचे आहे आणि आरामात राहायचे आहे.
यानंतर ऑरीने कबूल केले की तो 5 लोकांना डेट करत आहे. लग्नाबाबत पुढे बोलताना तो म्हणाला की, मला सध्या लग्न करायचे नाही. एकदा लग्न झाले की तुम्हाला कोणाला धोका देता येत नाही. मला धोका द्यायचा असेल तर तो आत्ताच द्यावा लागेल. मी धोका देत आहे कारण मी धोकेबाज आहे. अशी स्पष्ट कबुली यावेळी ऑरीने दिली.
View this post on Instagram
ऑरी अनेकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसतो. सारा अली खान, जान्हवी कपूरसह अशा अनेक स्टार्ससोबत पार्ट्यांमध्ये तो सहभागी होत असतो.त्यामुळे त्याची देखील एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे चर्चा होत असते. यासोबतच ऑरी बिग बॉस 17 या रिअॅलिटी शोमध्येही दिसला होता.