bollywood news – ‘कॉफी विथ करण’ सीझन 8 च्या आगामी एपिसोडमध्ये वरुण आणि सिद्धार्थ मल्होत्रा करण जोहरसोबत आयकॉनिक सोफ्यावर दिसणार आहे. करण जोहरने शो दरम्यान खुलासा केला आहे की सिद्धार्थ आणि वरुणने त्याला मेसेज सेंड करत आलियाला ‘स्टुडंट ऑफ द इयर’मध्ये कास्ट करण्यावर आक्षेप घेतला होता.
दरम्यान, वरुण आणि सिद्धार्थने 2012 मध्ये आलिया भट्टसोबत ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘कॉफी विथ करण 8’मध्ये दिसलेल्या या दोन कलाकारांबाबत शोमध्ये अनेक खुलासे झाले.
करण म्हणाला, “मला अजूनही आठवते आलियासोबत पहिल्यांदा काम करण्याची वेळी होती त्यावेळी, तुम्ही दोघांनी मला मेसेज केले होते की तुम्ही तिला कास्ट करू शकत नाही. तुमच्यापैकी एकाने सांगितले की ती खूप लहान आहे. अशा प्रकारे चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात झाली. आणि मला आठवते की या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा फोटोशूट होते त्यावेळी ती शांत उभी होती आणि तिने तुमच्यापैकी कोणाकडेही पाहिले नाही. एकतर ती लाजाळू होती कारण तुम्ही सर्व मला आधीच ओळखत होते. मात्र ती मला अजिबात ओळखत नव्हती. ” करणच्या या खुलाशावर सिद्धार्थने नकार देत आलियाचे कौतूक केले.
सिद्धार्थने नकार देताच यावर करण म्हणाला, “तुम्हा दोघांनाही मी तिला कास्ट करू नये असे वाटत होते. नाटक करणे बंद करा, तुम्ही मला इतर त्यावेळी मुलींचे फोटो पाठवत होता.’