बहुचर्चित ‘बच्चन पांडे’ चित्रपटाची डेट रिलीज

अक्षय कुमार एका पोठोपाठ एक चित्रपट करत आहेत. अलीकडेच त्याने “बेलबॉटम’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.  यानंतर आता त्याने “बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. साजिद नाडियाडवाला याच्या चित्रपटाचे जैसलमेर येथे शूटिंग सुरू झाले आहे. साजिद नाडियाडवाला, अरशद वारसी आणि कृती सॅनन हे जैसलमेर येथे आधिच विमानाने दाखल झाले होते. हा चित्रपट २६ जानेवारी २०२२ ला रिलीज होणार आहे.  

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

जैसलमेरमध्ये शूटिंगच्या पहिल्याच दिवशी हनुमान चौकात बसस्थानकाचा एक सेट उभारण्यात येथे काही सीन शूट करण्यात येत आहे. यावेळी अक्षय कुमार आणि कृति यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. जैसलमेर येथे “बच्चन पांडे’ची टीम दोन महिने शूटिंग करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या चित्रपटातील नायिका कृती सॅनन ही जैसलमेरच्या रस्त्यावर दुचाकीवर फिरताना दिसली. याचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. दरम्यान, “बच्चन पांडे’मध्ये अक्षय हा गॅंगस्टार, तर कृति सेनन ही पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. यात कॉमेडीसह जबरदस्त ऍक्‍शन सीन चाहत्यांना पाहण्यास मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.