पौड – मुळशी तालुक्यात 45 ग्रामपंचायत करिता सरपंच व उपसरपंच निवडीसाठी 9 आणि 10 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे, यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढला आहे. या आदेशाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी पुणे जिल्ह्यातील तहसीलदार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.
यामध्ये 9 फेब्रुवारीला भोईणी, रिहे, शेरे, मुठा, भुकूम, चांदे, नानेगांव, मुलखेड, जांबे, काशिग, घोटावडे, कासारआंबोली, पौड, अंबडवेट, मारूंजी, कासारसाई, हिंजवडी, नांदे, माण, लवळे, उरवडे, चिंचवड, वाळेण या 23 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदांची निवड होईल. तर 10 फेब्रुवारीला बोतरवाडी, खांबोली, मांदेडे, आंदेशे, हाडशी, भरे, चाले, आंदगांव, कोळावडे, नेरे, भालगुडी, कातरखडक, नांदगांव, साठेसाई
कुळे, मुगावडे, दखणे, चिखलगांव, खेचरे, अकोले, कोळवण, आंबेगांव या 22 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची निवड होणार आहे. मुळशी तालुक्यातील एकूण 45 ग्रामपंचायत पैकी 36 ग्राम पंचायतीसाठी 15 जानेवारीला मतदान झाले होते. याची मतमोजणी 18 जानेवारीला झाली होती. तर 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.